Published On : Mon, Dec 9th, 2019

संत जगनाडे महाराजांचे विचार समाजासाठी प्रेरक: चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी

नागपूर: संत जगनाडे महाराज यांचे विचार सर्व समाजासाठी प्रेरक आणि दिशादर्शक आहेत. हे विचार समजाचे भांडवल असून सर्वांनी या विचारांनी प्रेरित होऊन कार्य केल्यानेच जीवनात यशस्वी होणे शक्य असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्रीय तेली सेवा संघातर्फे आज नागपुरात संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी बावनकुळे बोलत होते. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष कमलाकर घाटोळे, अध्यक्ष शशिकांत डांगरे, उपाध्यक्ष कुमार बावनकर, दिलीप तुपकर,मंगेश नरड, नरहरी सुपारी, मंगेश दिवटे, चंदू वैद्य, गोपाल इटनकर अदी उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले- संतांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या विचारांची आठवण सर्वांना होते. अशा प्रकारचे कार्यक्रम हे समाजाला प्रेरणा देणारे असतात.

तसेच या निमित्ताने सर्व समाज एकत्र येऊन विचारांचे आदान प्रदान होते. संस्थेच्या पुढील कार्याची दिशा ठरविली जाते. सहकार्याची भावना वाढीस लागते. शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात समाजाची प्रगती साधण्याच्या दृष्टीने विचार केला जातो. यासाठीच या कार्यक्रमांचे महत्त्व अधिक आहे, असेही बावनकुळे म्हणाले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

Advertisement
Advertisement