नागपूर: समाजातील हजारो व्यसनाधीनांना व्यसनमुक्त करून त्यांचे संसार वाचविण्याचे उल्लेखनीय काम परमात्मा एक सेवक मंडळाने केले असून मंडळाच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
हुडकेश्वर येथे परमात्मा एक सेवक मंडळातर्फे मानव धर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना वरील विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध÷यक्षस्थानी राजू मदनकर, कार्यक्रमाचे उद्घाटन फकीराजी जीभकाटे यांच्या हस्ते झाले. सकाळी 7 वाजेपासून सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी आणि त्यांच्या मातोश्री वाराणसीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आज सकाळी 7 वाजता हवन कार्य करण्यात आले. सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेत मोठ्या संख्येने मंडळाचे सेवक व महिला सेंवक सहभागी झाले होते. मानव धर्माच्या शिकवणुकीवर परिसंवाद व चर्चासत्र दुपारी 1 पासून आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उपाध्यक्ष मनोहर देशमुख, सचिव सुरजलाल अंबुले, कोषाध्यक्ष बालाजी नंदनकर, सहसचिव मोरेश्वर गभने.संचालक वासुदेव पडोळे, सुखदेव लांजेवार, टीकारामजी भेंडारकर, संजय महाकाळकर व अन्य उपस्थित होते.