Published On : Tue, Dec 24th, 2019

साई सावली वृध्दाश्रमाचा वर्धापनदिन साजरा

श्री सत्यसाई बहुउद्दशीय संस्था द्वारा संचालित साई सावली वृध्दाश्रमाचा आज 3 रा. वर्धापन दिन व आजी आजोबांचे स्नेहसंमेलन सोबत आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. व श्री मोहन बिजवार आणि डाॅ. कालमेघ मॅडम यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले.
सा रे ग म या दर्जेदार कार्यक्रमाच्या फेम कु. भागयश्री टिकले यांनी आपल्या शास्त्रीय व सुगंम संगितांनी प्रेक्षकांना एक मोहिनी घातली होती, तीला तबल्यावर श्री मुर्ते सर व हार्मोनियम श्री उरकुडे सर यांनी साथ दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका तसेच या संस्थेच्या सचिव सौ विशाखा मोहोड यांनी केली त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती व उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनीसदिच्छा भेट दिली ज्यात श्री भुपेंद्रजी शहाणे, नगरसेविका जयश्रि वाडिभसमे, श्री राजेंद्र ढोबळे, श्री डागा, संजय बालपांडे, संदिप हरडे, श्री सुर्यवंशी होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चैताली केळझरकर, डाॅ. सौ. सोनल डुमरे, सौ. शितल मिसाळ व आभार प्रदर्शन कु. वैषनवी गीते यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विनोद केळझरकर, सचिव विशाखा मोहोड, कोषाध्यक्ष श्री रविंद्र गीते, श्री हेमंत डुमरे, श्री उदय लाड, श्री रविंद्र मिसाळ, श्री आशीष केळझरकर, श्री निलेश खुटाफले, श्री अनंत कदम, श्री अभिजीत मस्के, श्री मनोज केळझरकर, श्री तिर्थराज बोबडे यांनी अथक प्रयत्न केले.