Published On : Mon, Sep 21st, 2020

सायेब!…मले कोरोना झाला का जी?

Advertisement

एकाच व्यक्तीच्या,एकाच दिवशी कोरोनाचे दोन वेगवेगळे रिपोर्ट, सायेब!..मी कुणावर भरोसा ठेवू जी? ,सालईदाभा येथील तरुणाशी घडला प्रकार, कोरोना टेस्टकिट बद्दल शंका

नागपूर – राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे संकट सर्वांसमोर”आ”वासून बसले आहे.अशा परिस्थितीत कोरोनवर मात मिळविण्याचे प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत असल्याचे दावे हे फोल ठरत आहे.आरोग्य यंत्रणेची कुजकामी व ढिसाळ व्यवस्था ही परिसरातील जनतेकरिता चिंतेचा विषय बनली असून त्याचे ताजे उदाहरण बुटीबोरी पासून १० की मी अंतरावरील सालईदाभा येथे बघायला मिळाले.येथील एका तरुणाची एकाच दिवशी कोरोना टेस्ट केली असता दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रिपोर्ट आल्याने सायेब! मले कोरोना झाला का जी? असा रास्त प्रश्न त्या पिढीत युवकाने प्रशासनाला केला आहे.

बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील सालईदाभा ग्रामपंचायत अंतर्गत एका कंपणीत कंत्राटी कामगारांची भरती सुरू होती.हा युवक सुद्धा बेरोजगार व घरातील कर्ता युवा असल्याने तो त्या कंपनीत काम मागायला गेला होता.त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी त्याला स्वतःची कोरोना चाचणी करायला सांगितली होती.त्यामुळे त्याने कान्होलीबारा येथील प्रा आ केंद्रात जाऊन आपली स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली असता तो कोरोना पोजिटिव्ह निघाला.विशेष म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा आजार,सर्दी,खोकला किंवा दुखणे नसल्यामुळे व कामाची फार गरज असल्याने त्याने बुटीबोरी येथील खाजगी रुग्णालय (माया हॉस्पिटल) येथे सुद्धा जाऊन कोरोनाची चाचणी करून घेतली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

त्यामुळे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कोरोना टेस्ट मध्ये वेगवेगळे रिपोर्ट आल्यामुळे जनते मध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून कोरोना किट बद्दल शंका उपस्थित केली आहे.तर कामाची गरज असलेल्या युवकाच्या दोन वेगवेगळ्या रिपोर्ट येऊन त्याला काम न मिळाल्याने सायेब!….मी कोणावर भरोसा ठेवू जी? असा प्रश्न प्रशासनाला केला आहे.

संबधित प्रकारणसंदर्भात नागपूर ग्रामीण चे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हेमके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की एका दिवसात तीनदा कोरोनाच्या चाचण्या केल्या असता तीन पैकी एक जरी चाचणी पोजिटिव्ह आली असेल तरी तो व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समजावे.त्याचप्रमाणे दोन कोरोना चाचणी मध्ये काहीवेळाचे अंतर असल्यास दोन चाचण्यात तफावत येऊ शकते.परंतु दोन पैकी एक चाचणी जर पोजिटिव्ह असेल तर तो व्यक्ती कोरोना बाधित असून त्याने होम कोरोन्टीन व्हावे.

– संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी