नवी दिल्ली: सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात मेंदूवर शस्त्रक्रिया पार पडली. यासंदर्भात स्वतः सद्गुरु यांनी व्हिडीओ शेअर करत माहिती दिली. तसेच इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, सद्गुरूंनी शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलच्या बेडवर विनोद केला. यात ते म्हणाले की, अपोलो हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जनने माझी कवटी कापली आणि काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला.
पण त्यांना काहीही सापडले नाही… ते पूर्णपणे रिकामे आढळले. ते म्हणाले की, मी दिल्लीत आहे, माझ्या कवटीवर पॅच आहे पण कोणतेही नुकसान नाही, असे सद्गुरु म्हणाले आहेत.
दरम्यान सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मेंदूच्या एका भागात सूज आणि रक्त गोठले होते.
डॉक्टरांनी सांगितले की ते धोकादायक असू शकते त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली. ईशा फाऊंडेशनने सांगितले की सद्गुरु शस्त्रक्रियेनंतर बरे होत आहेत आणि बरीच सुधारणा होत आहेत.