मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप पक्षासोबत भेटीगाठी सुरु केल्या आहेत.आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणजे राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढू शकतो.
मुंबईत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु आहे. ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.दरम्यान दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली.यानंतरच मनसे महायुतीत सहभागी होणार,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.