Published On : Sun, Aug 20th, 2017

विभागीय आयुक्त कार्यालयात सद् भावना दिन साजरा


नागपूर:
दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद् भावना दिन म्हणून आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामुहिकपणे सद् भावना दिनाची शपथ दिली.

यावेळी अप्पर आयुक्त आर.एस. जगताप, भूसुधार सहाय्यक आयुक्त सुधाकर कुळमेथे, उपायुक्त पराग सोमन, संजय धिवरे, यु.बी. घाटे, सहाय्यक आयुक्त घनश्याम भुगावकर, सहाय्यक संचालक कमलकिशोर राठी, सुधीर शंभरकर, तहसिलदार संपत खलाटे, रविंद्र माने, श्रीराम मुंदडा, नायब तहसिलदार श्रीमती सुजाता गावंडे, शैला राऊत, नाझर प्रमोद जोंधुळकर यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्व.राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.