Published On : Sat, Feb 23rd, 2019

सदरमध्ये आढळला सलूनच्याआड कुंटनखाना

नागपूर : सलूनच्या आड चालविल्या जाणाऱ्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा मारून बबिता बोरकर (वय ३८) नामक महिलेला ताब्यात घेतले.

सदर मधील मंगळवारी कॉम्प्लेक्सच्या बाजूला एका इमारतीत बबिता युनिसेक्स सलून चालवित होती. तेथे ती देहव्यवसाय चालवित असल्याची माहिती कळताच एसएसबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे बबितासोबत पोलिसांनी पाठविलेल्या ग्राहकाने संपर्क साधला. तिने ४ हजारात वेश्याव्यवसाय करणारी तरुणी उपलब्ध करून देण्यााची तयारी दाखवली. ठरल्याप्रमाणे बबिताने ग्राहकाकडून रक्कम घेऊन त्याला एक तरुणी उपलब्ध करून देताच शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी तेथे छापा मारला. पोलिसांनी तेथून बबितासह दोन तरुणींना ताब्यात घेतले.

बबिताची सदर ठाण्यात वृत्त लिहिस्तोवर चौकशी सुरू होती.