| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jul 24th, 2018

  सचिन तेंडुलकर देव दामोदराच्या दर्शनासाठी गोव्यात

  पणजी: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अचानक गोव्यात येत, जांबावली येथील प्रसिद्ध दामोदर देवस्थानात जाऊन दर्शन घेतले. सचिन दामोदर देवस्थानचा निस्सीम भक्त आहे. सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजता सचिनने आपल्या मित्रासोबत देवस्थानला भेट देऊन आशीर्वाद घेतले.

  सचिन तेंडुलकर गोव्यात अनेकदा येत असतो. दक्षिण गोव्यातील मार्टिन कॉर्नर मधील सी फूड त्याला प्रचंड आवडते. त्याशिवाय सचिन गोव्यात आला की देव दामोदराचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाही.

  आज सायंकाळी सव्वा सात वाजता सचिन सावर्डे येथील आपला मित्र अनूप कुडचडकरसोबत जांबावली येथील दामोदर संस्थानमध्ये आला होता. सचिनने मंदिरात आल्यानंतर पूजा केली आणि देवाला कांबळ अर्पण केले. सचिनने दामोदर देवस्थानच्या भानुदास राखणदाराला देखील भेट दिली.

  जवळपास एक तास सचिन देवस्थान परिसरात होता. सव्वा आठच्या सुमारास सचिन देवस्थानातून निघाला अशी माहिती देवस्थानचे सेवेकरी विनोद प्रभाकर जांबावलीकर यांनी दिली. दामोदर देवस्थानचा गुलालोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.

  क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सचिनने अनेकदा या देवस्थानला भेट दिली आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145