Published On : Tue, Jan 30th, 2018

धादांत खोटे वृत्त प्रकाशीत करून बदनामी केल्याप्रकरणी जळगाव तरुण भारत वृत्तपत्राला सचिन सावंत यांची कायदेशीर नोटीस

Advertisement

Sachin Sawant
मुंबई: धादांत खोटे वृत्त प्रकाशीत करून काँग्रेस पक्षाची व वैयक्तिक बदनामी केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी जळगाव तरुण भारत या वृत्तपत्राला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, जळगाव तरुण भारत वृत्तपत्राने माझे नाव घेऊन छापलेले वृत्त धादांत खोटे असून हे पीत पत्रकारितेचे उदाहरण आहे. प्रथमतः संघाची प्रार्थना ही संविधान विरोधी असल्याने प्रदेश काँग्रेस तर्फे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ती वाजवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तशी ती वाजवलीही नाही.

मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो व राष्ट्र गीताची सीडी बनविण्याची जबाबदारी ही माझी नसते. तरीही कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता व अधिकृत प्रतिक्रिया न घेता छापलेली सदर बातमी ही बदनामीकारक असल्याने सदर वृत्तपत्राला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे असे सावंत म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement