Published On : Thu, Jul 2nd, 2020

ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी आज वेबिनार

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या वीज ग्राहकांच्या देयकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महावितरणच्या नागपूरग्रामीण मंडळ कार्यालयाच्या वतीने उद्या दिनांक ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधल्या जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे. यात सहभागी होण्यासाठी वीज ग्राहकांनी http://bit.do/NagpurRuralWebina या लिंकवर क्लिक क्लिक करायचे आहे.

या वेळेत वीज ग्राहकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली जातील. या सोबतच महावितरणच्या ग्रामीण मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या मौदा,उमरेड, सावनेर,काटोल विभागीय कार्यालये आणि उपविभागीय कार्यलयात पुढील आठवड्यात याचा प्रकारे वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधल्या जाणार आहे.

वीज ग्राहकांनी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून वीजबिलाची सविस्तर आकारणी तपासून आपले देयक योग्य असल्याची पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.