Published On : Fri, Oct 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कोराडी महालक्ष्मी मंदिरातील प्रकल्पांच्या उद्घाटनाबाबत अफवा; संस्थानकडून नागरिकांना सावधगिरीचा इशारा

Advertisement

कोराडी महालक्ष्मी मंदिरातील प्रकल्पांच्या उद्घाटनाबाबत अफवा; संस्थानकडून नागरिकांना सावधगिरीचा इशारा

नागपूर : श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी येथे ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान अश्विन नवरात्र महोत्सव-२०२६ आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, मंदिरातील कार्यक्रम आणि विकासकामांबाबत सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहितीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.

मंदिर परिसरात सध्या विविध कामे सुरू आहेत. या कामांचे उद्घाटन नवरात्र महोत्सवादरम्यान होणार असल्याची माहिती काही युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून प्रसारित केली जात असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे. अशा माहितीला कोणताही अधिकृत आधार नसून, त्यातून नागरिकांची दिशाभूल होऊ शकते.

नवरात्र महोत्सवातील कार्यक्रम, विविध उपक्रम तसेच विकासकामांच्या उद्घाटनासंदर्भातील संपूर्ण माहिती संस्थानकडून वेळोवेळी अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता संस्थानच्या अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.