| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 2nd, 2015
  Vidarbha Today | By Nagpur Today Vidarbha Today

  कन्हान : पारशिवनी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी लाखो रुपयांचा दंड


  कन्हान।
  पारशिवनी तालुक्यातील अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी वेगवेगळ्या कारवाईत लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असुन, ही पारशिवनी तालुक्यातील पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

  आज दिवसभर नागपूर जिल्ह्याबरोबरच चौदाही तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाविरोधी विशेष मोहीम जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. त्यामुळे रेतीमाफीयांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. पारशिवनी तालुक्यातील सालई मोकासा विटाभट्ट्यावर 1 लक्ष 19 हजार 520 रुपये, मकरधोकडा विट्टाभट्यावर 48 हजार 140 रुपये , सालई मोकासा येथील त्रिपाठी यांच्या विटाभट्यावर 59 हजार 760 रुपयांचा दंड ठोकण्यात आला. असे 2 लाख 68 हजार 920 रुपयांचा पाच विटाभट्यावर दंड ठोकण्यात आला . त्याचप्रमाणे सिंगोरी येथील ग्राम्स सिमेंट विटाभट्टीवरील 4016 ब्रास रेती जप्त केली आहे. हा रेतीचा साठा करोडो रुपयांचा असुन ही सर्वात मोठी कारवाई आहे. या विटाभट्ट्याच्या स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा महसुल विभागाकडे तक्रारी केलेल्या होत्या. याची चौकशीही करण्यात आली होती. मात्र त्यात काहीही निष्पण झालेले नव्हते. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण विभागाने यापुर्वी या परीसरातील शेताींचा सर्व्हे केला त्यामध्ये शेतामध्ये 1 फुटापर्यंत राख आढळुन आलेली होती. हे विशेष ! तालुक्यात 9 ट्रँक्टर गौणखनिजाचे पकडण्यात आले असुन 30 हजार 600 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला.

  ही मोहीम आज रात्री उशीरापर्यंत होणार आहे.

  ही कारवाई उपविभागीय अधिकारी राम जोशी, तहसीलदार बाळासाहेब टेळे, नायब तहसीलदार गणेश जगदाळे, मंडळ अधिकारी दाते, तलाठी यांच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आली.
  illegal-sand-mining

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145