Published On : Wed, Apr 20th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कांद्री च्या झाडीझुडपात चोरीचा ठेवलेला ५० हजार रू. चा चोरीचा कोळशा पकडला

– वेकोलि सुरक्षा आधिकारी ची कारवाई कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल.


कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस ४ कि मी अंतरावर असलेल्या फुकट नगर कांद्री येथे अवैद्यरि त्या वेकोलि कामठी उपक्षेत्र खुली खदान चा एकुण ५० हजार रूपयाचा कोळसा आरोपींनी चोरून झाडी झुडपीत साठवुन ठेवलेला चोरीचा कोळसा वेकोलि सुरक्षा आधिकारी रविकात कान्डे यांनी पेट्रोलिंग दर म्यान पकडुन कन्हान पोस्टे ला तक्रार दाखल केल्याने पोलीसानी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.१९) ला पहाटे सकाळी ८ वाजता वेकोलि सुरक्षा अधिकारी रविकांत कान्डे हे त्यांच्या सुरक्षा रक्षक व चालकासह वेकोलि कामठी उपक्षेत्र खुली खदान परिसरात पेट्रो लिंग करीत असताना फुकट नगर कांद्री च्या झाडीझु डपीत वेकोलि च्या डेपो मधुन काही इसमाने कोळसा चोरून साठवुन ठेवलेल्या कोळसा ढिगारा जवळ उभे दिसले. सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकाना पाहुण आरोपी पळुन गेले. त्यांना ओळखत असुन आरोपी फारुख अब्दुल्ला शेख राह. कांद्री कन्हान असे असुन जमीनीवर पडलेला कोळसा पे लोडर च्या साह्याने ट्रक मध्ये भरून कोळसाचे वजन काट्यावर नेऊन वजन केले असता कोळस्याचे वजन १० टन भरले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सदर कोळसाची किंमत अंदाजे ५००० रूपये प्रति टन असे एकुण ५० हजार रूपयाचा मुद्देमाल घटना स्थळावरून जप्त करून कोल डिपो मध्ये जमा करण्यात आला. सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीस स्टेशन ला सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कान्डे यांच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसानी आरोपी १) फारुख अब्दुल्ला शेख विरुद्ध अप क्र १८८/२०२२ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पो लीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हा न पोलीस हवालदार जयकुमार सहारे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Advertisement
Advertisement