Published On : Tue, Mar 16th, 2021

रेडियंस हॉस्पीटल वर ५० हजारांचा दंड

Advertisement

– उपमहापौरांनी केली पाहणी : लसीकरणमध्ये हलगर्जीपणा

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांचा निर्देशावर वर्धमाननगर येथील रेडियंस हॉस्पीटल वर रु ५०,००० चा दंड लावला. रेडियंस हॉस्पीटल च्या कर्मचा-यांनी कच-यामध्ये जैविक कचरा टाकला होता.

उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी सोमवारी (१५ मार्च) रोजी सकाळी डॉ.मनोज पुरोहित यांच्या रेडियंस हॉस्पीटलची पाहणी केली. या रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. परंतु या रुग्णालयात एकाच कक्षात लसीकरण होत आहे आणि नोंदणी सुध्दा केली जात आहे. तसेच रुग्णांसाठी निरीक्षण कक्षाची व्यवस्था सुध्दा बरोबर नाही आहे. परिचारीकानासुध्दा लसीकरणाचे प्रशिक्षण दिल्या गेले नाही. रुग्णालयाची साफ-सफाई वर बरोबर लक्षदिले जात नाही. उपमहापौर मनीषा धावडे आणि लकडगंज झोनच्या सहाय्यक आयुक्त साधना पाटील आणि झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.भैसारे यांनी लसीकरणामध्ये होत असलेल्या हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त केली. येथे लसीकरण झालेल्या रुग्णांना प्रमाणपत्र सुध्दा दिल्या जात नाही. श्रीमती धावडे यांनी सांगितले की कोणत्याही वयोगटाच्या नागरिकांना येथे लस दिली जात आहे. हे कन्द्र शासनाचे नियमांचे उल्लंघन आहे.

उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रेडियंस हॉस्पीटल सोबत १० आस्थापना विरुध्द कारवाई केली. शोध पथकाने १ लाखाचा दंड लावला तसेच ६४ मंगल कार्यालयाची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

तसेच महानगरपालिकेच्या सर्व झोनमध्ये खाजगी कार्यालयांची तपासणी सोमवारी करण्यात आली. लकडगंज झोन, आशीनगर झोन, धरमपेठ झोन, सतरंजीपूरा झोन, गांधीबाग झोन मध्ये खाजगी कार्यालयांची तपासणी केली. मनपातर्फे खाजगी कार्यालयाचे संचालकांकडून दंड वसूल करण्यात आला.

तसेच मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या निर्देशावर पूनम चेर्म्बस छावनी रोड येथील पहिल्या माळयावरील मॅकडोनल्ड हॉटेल नियमांचे उल्लंघन केल्याबददल सील करण्यात आले. मंगलवारी झोनचे सहाय्यक आयुक्त हरिष राऊत यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.