Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jun 16th, 2018

  धक्कादायक ;१.४४ लाख कोटींचे कर्ज ‘राईट ऑफ’

  नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष १०१७-१८ मध्ये १ लाख ४४ हजार कोटी रुपयांचे रेकॉर्ड कर्ज थकीत खात्यात (राईट ऑफ) टाकले आहेत. ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६१.८% अधिक आहे. गेल्या दशकभरात असे पहिल्यांदाच घडल्याचे समोर आले आहे, ज्यात सार्वजनिक बँकांना मोठ्या प्रमाणात रक्कम थकीत खात्यात टाकावी लागली.

  तर एकीकडे सार्वजनिक क्षेत्रातील २१ बँकांनी २०१६-१७ पर्यंत एकत्रित नफा कमावला होता, परंतु २०१७-१८ मध्ये त्यांना ८५,३७० करोड रुपयांचे एकाएकी नुकसान झाले. २०१६-१७ हे अर्थी वर्ष बँकिंग सेक्टर करीत अतिशय खराब राहिले होते. रेटिंग एजन्सी आयसीआरए च्या अनुसार मागील १० वर्षात सरकारी तसेच सहकारी बँकांनी जवळपास ४ लाख ८० हजार कोटींचे कर्ज थकीत खात्यात टाकले होते, तर दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ४ लाख कोटींची रक्कम थकीत खात्यात टाकली होती.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145