Published On : Fri, Jul 31st, 2020

नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा जप्त केला आहे.

रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक रवी जेम्स, उपनिरीक्षक एस. पी. सिंह बुधवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर गस्त घालत होते. त्यांना इटारसी एण्डकडील भागात ठेवलेल्या पार्सलमधून गांजासारखा उग्र वास आला. तेथे तीन पोते ठेवलेले होते. तेथील पार्सल क्लर्कला विचारणा केली असता त्याने खासगी हमालांनी हे पोते रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ मधून चुकीने उतरविले असून हे पोते नागपूरचे नसल्याची माहिती दिली.

तेथे सहायक सुरक्षा आयुक्त कोटा जोजी व पंचासमक्ष पोत्यांची तपासणी केली. त्यात २० पाकिटात ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा आढळला. जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.