Published On : Tue, Dec 10th, 2019

बेवारस बालिकेबाबत निवेदन

Advertisement

नागपूर: रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना दिनांक 17 जून रोजी रेल्वे स्थानकाच्या प्लॅट फॉर्म क्रमांक 1 वरील पुलाखाली माही नामक बालिका अंदाजे पाच महिन्यांची, वर्ण सावळा ही बेवारस स्थितीमध्ये आढळून आली. रेल्वे पोलिसांना अद्याप बालिकेच्या पालकांचा शोध लागला नाही.

बालिकेवर हक्क दाखवायचा असलेल्या पालकांनी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अपर्णा कोल्हे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण दूरध्वनी क्रमांक 0712-2569991 दहा दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अपर्णा कोल्हे यांनी केले आहे.

बेवारस बालिकेबाबत पालक अथवा नातेवाईकांनी संपर्क न साधल्यास केंद्रीय दत्तक प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या नियमावलीनुसार बाल कल्याण समितीच्या आदेशाने दत्तक मुल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके व विधी संघर्षग्रस्त बालकांकरिता कार्य केले जाते. रस्त्यावर सोडून दिलेल्या व घरुन निघून आलेल्या बालकांचे पुनर्वसन व पालन पोषणाची जबाबदारी जिल्हा महिला व बाल विकास विभागाने स्विकारली असल्याची माहिती श्रीमती अपर्णा कोल्हे यांनी दिली आहे