| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 3rd, 2019

  छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा शासकीय इमारतींवर अनिवार्य करणार — डॉ. परिणय फुके

  मुंबई : यापुढील काळात सर्व शासकीय इमारतींवर छत्रावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा (रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम) अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.

  आज मंत्रालयात राज्यमंत्री डॉ. फुके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली.

  सध्या बांधकाम होत असलेल्या आणि गेल्या पाच वर्षांत बांधल्या गेलेल्या शासकीय इमारतींवर छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्यात येईल. राज्यातील रस्ते खडडेमुक्त करण्यासाठी मोबाईल ॲप, 48 तासात खडडे बुजविण्यात यावेत यासाठी कंपनीला सूचना देण्यात येणार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे अधिक वेगवान होण्यासाठी 7 दिवसांची निविदा काढण्याबाबत सूचना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. फुके यांनी दिली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145