Published On : Wed, Apr 10th, 2019

संघाची भूमिका, से नो टू ‘नोटा’ : १०० टक्के मतदानासाठी आग्रह

नागपूर : निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचारापासून दोन हात लांब राहिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘नोटा’च्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. मतदारांनी ‘नोटा’चा वापर करु नये, असे आवाहनच संघाकडून करण्यात आले आहे. मतदानात ‘नोटा’ची तरतूद असली, तरी त्याचा वापर करु नका. योग्य उमेदवाराला मत द्या, असे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील काही काळापासून ‘नोटा’मुळे देशातील अनेक जागांवर उलटफेर पहायला मिळाले आहेत. त्यामुळे संघाने ‘नोटा’च्या विरोधातच भूमिका घेतली आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमातदेखील नोटा वापरला तर तोटा होईल, असे विधान केले होते. मतदानादरम्यान ‘नोटा’ वापरले तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे सद्यस्थितीत जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वोत्तम व राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मत द्यावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

Advertisement

पक्षीय राजकारण, जातिसंप्रदायांच्या प्रभावाचे राजकारण यापासून संघ सुरुवातीपासूनच दूर राहत आला आहे व पुढेदेखील दूरच राहणार. मात्र संघाचे स्वयंसेवक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडत असतात. मतदारांनी राष्ट्रहिताला सर्वतोपरी मानत स्वार्थ, संकुचित भावना, भाषा, प्रांत, जाती यापलिकडे जाऊन विचार केला पाहिजे. उमेदवाराची प्रामाणिकता व क्षमता, पक्षाच्या धोरणाची राष्ट्रहितासोबतची प्रतिबद्धता तसेच वर्तमान कार्यांचे अनुभव याआधारावर मतदारांनी मत दिले पाहिजे, अशी संघाची भूमिका आहे.

शतप्रतिशत मतदान करा
मतदान न करणे किंवा ‘नोटा’च्या अधिकाराचा उपयोग करणे हे सर्वात अयोग्य असलेल्या उमेदवाराला फायदा पोहोचविणारे ठरते.त्यामुळेच १०० टक्के मतदान आवश्यक आहे. भारताच्या निवडणूक आयोगाकडून १०० टक्के मतदानाचा आग्रह धरला जातो, असे प्रतिपादन संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर केले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement