Published On : Thu, Sep 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोहित पवार आक्रमक; नागपुरात आज विभागीय आयुक्तांना निवेदन

Advertisement

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोहित पवार आक्रमक; नागपुरात आज विभागीय आयुक्तांना निवेदन

नागपूर : पूर्व विदर्भातील धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील आंदोलनांनंतर रोहित पवार आज नागपूर विभागीय आयुक्तांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादरणार आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून रोहित पवार गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि तुमसर येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मोर्चे काढण्यात आले.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज नागपुरात विभागीय आयुक्तांना देण्यात येणाऱ्या निवेदनातून धानाला योग्य बोनस जाहीर करावा, शासकीय धान खरेदी केंद्रे वेळेत सुरू करावीत, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तत्काळ भरपाई द्यावी आणि शेतीसाठी नियमित वीजपुरवठा करावा, अशा प्रमुख मागण्या मांडल्या जाणार आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.