Published On : Mon, Aug 12th, 2019

” रस्ता सुरक्षा, जिवन रक्षा ” शिबीर कन्हान ला थाटात संपन्न

स्कुल व्हँन चालक संघटन कन्हान -कामठी व्दारे आयोजन

कन्हान: स्कुल व्हँन चालक संघटन शाखा कन्हान – कामठी व्दारे नागरिकात जन जागृतीपर ” रस्ता सुरक्षा, जिवन रक्षा ” शिबीर कन्हान ला थाटात संपन्न करण्यात आले.

शनिवार (दि.१०) ला कुलदीप मंगल कार्यालय रायनगर कन्हान येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपुर जिल्हा ग्रामीण मा. श्रीपाद वाडेकर यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपुर मा. सुबोध देशपांडे, वैद्यकीय अधिकारी कन्हान डॉ योगेश चौधरी, स्कुल व्हँन चालक संघटन विदर्भ अध्यक्ष अफसर खान, नगरसेविका अनिताताई पाटील, वर्धा जिल्हा अध्यक्ष सचिन गौरखेडे , राजेश शेंडे , काजीभाई मुस्तकिन, लालचंदजी मिश्रा, विशाल ऊके, बबलु भाई आदीच्या प्रमुख उपस्तित जन जागृतीपर ” रस्ता सुरक्षा, जिवन रक्षा ” शिबीरांचे उदघाटन करण्यात आले. मान्यवरांचे संघटने व्दारे स्वागत करून शिबीराची सुरूवात करण्यात आली. वाहन चालक व नागरिकांनी वाहतुक नियमाचे काटेकोर पणे पालन केल्यास स्वतःचे व प्रवाश्यांचे जिवन सुरक्षित करून अपघाताचे प्रमाण कमी करता येते. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेते बाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्कुल व्हँन चालक संघटन कन्हान अघ्यक्ष पंकज रामटेके यांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

शिबीराच्या यशस्वीते करिता रजनीश (बाळा), मेश्राम, नरेंद्र पांडे,अश्विन उमराय, एस.बी.थॉमस सर, हेमंत बांगरे ,आशिष आनंद, अश्विन हेलवटकर, विक्की बागाईतकर, दत्ता कांबळे, सुनील गोरले, रवी गायगोले, प्रल्हाद डोंगरे, विनोद रोकडे, संजय राव, नईम कुरेशी, नीलम कांबळे, मनोहर भाऊ, दिलीप सावरकर, चिंटु वाकुडकर, अभिजीत चंदूरकर, मयूर माटे, रवी हटवार, प्रशांत पाटील आणि पालकवर्गानी सहकार्य केले. शिबिरास राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हानचे कार्याध्यक्ष बाळुभाऊ नागदेवे, कैलास खोब्रागडे, नरेंद्र पात्रे, गज्जु भल्लारे, सुरेश शेंदरे, विनोद रंगारी, नंदू देशभ्रतार, सुधराज वाघमारे, जोसेफ, सुवर्णा गायकवाड, परम पात्रे, शेखर पेटारे प्रामुख्याने उपस्थित होते.