Published On : Wed, Feb 24th, 2021

मेडिकल चौक ते सरदार पटेल चौकापर्यंतचा रस्ता २१ मे पर्यंत वाहतुकीसाठी बंद

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा क्र. ३ मधील रस्ता क्र. ३७ मेडिकल कॉलेज चौक ते सरदार पटेल (ग्रेट नाग रोड) पर्यंतचा रस्ता सीमेंट क्राँक्रीटचा करणे प्रस्तावित आहे. या कामाकरिता २५ फेब्रुवारी ते २१ मे पर्यंत संबंधित रस्ता संपूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्गमित केले आहेत.

या रस्त्यावरील वाहतूक मेडिकल चौक ते आशीर्वाद चौक मार्गे वळविण्यात येत आहे. कामाच्या ठिकाणी सूचना फलक, काम सुरू केल्याची, कार्म पूर्ण करण्याची दिनांक नमूद करण्यासोबतच कंत्राटदाराने स्वत:चा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला फलक लावण्याचेही निर्देशित कले आहे.

या आदेशाच्या माध्यमातून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कंत्राटदाराने काय करावे, याबाबतही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी असलेल्या किंवा कार्यालय असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याचेही आदेशात म्हटले आहे.