Published On : Mon, Mar 30th, 2020

कामठी तालुक्यातील गावागावातील रस्ते बंद

Advertisement

स्लग:-कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे सक्तीचे पालन

कामठी :-कामठी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक उपायययोजनांचे सक्तीचे पालन सुरू असून महसूल, पोलीस, आरोग्य आणि नगर परिषद, पंचायत समिती विभाग सक्रिय झाले आहेत .तीन आठवड्यासाठी कर्फु घोषित झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे

दरम्यान पोलीस विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाहीचा बडगा उभारण्याच्या इशारा दिला असल्याने पोलीसंचोही नागरिकांत भितो आहे त्यातच या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी गावातील कुणीही बाहेर जाऊ नये व गावात कुणीही बाहेरील व्यक्ती येऊ नये यासाठी तालुक्यातील कढोली, खसाळा-म्हसळा, कवठा आदी गावात गावबंदी करण्यात आली आहे.

तालुक्यातील अनेक गावा च्या मुख्य प्रवेशद्वार जवळ बाहेरील व्यक्तीस गावबंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहेत अनेक गावांत लाकडी बास लावून प्रवेश बंद करण्यात आले असून अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत तर काही जण निरर्थक घराबाहेर पडल्याने पोलीस डुंडकेचा प्रसाद देत घरी पाठवीत आहेत आणि आवश्यक सेवेतील कर्मचारी ओळखखपत्र सोबत ठेवून फिरत आहेत

संदीप कांबळे कामठी