Published On : Tue, Aug 9th, 2022

दत्तवाडी परिसरात अमरावती महामार्गावर अवतरली नदी !

Advertisement

– खड्यात गेला महामार्ग चा रस्ता,2 ठिकाणी रस्त्याशेजारील पाईप लाईन ब्लॉक!

वाडी-अमरावती महामार्गावर वाडी-दत्तवाडी परिसरातून उड्डाण पूल निर्माण कार्याचे काम गतीने सुरू आहे.त्या मुळे रस्ताच्या दोन्ही बाजूला सर्व प्रकारच्या वाहन धारकांना वाहतुकीसाठो मोजकीच जागा कंत्राटदार कम्पनी व पोलीस विभागांनी उपलब्ध करून दिली आहे.मात्र नुकत्याच झालेल्या पावसाने याही रस्त्याची अवस्था गंभीर झाली असून सोमवारी सकाळी तर अक्षरशः दत्तवाडी परिसरातील महामार्गावर नागरिक व वाहनचालकांना रस्त्यावर नदी वाहताना दिसून आली.,तर शेकटो ठिकाणी खड्डे व त्यात पाणी दिसून आल्याने रस्तात खड्डे की खड्यात रस्ते असे चित्र बघावयास मिळाले.

सोमवारी सकाळी या रस्त्यावर नदी वाहत असल्याची सूचना वाडी तिल प्रसार माधयमाना मिळताच प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असता.शुभम मंगल कार्यल्यासमोरून नप ची निरुपयोगी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यातील पाईप जाम झाल्याने मोठया प्रमाणात पाणी रस्तावर येऊ लागले व नदी स्वरूप ते उतार दिशेला वाहत होते.तशीच स्थिती नवनिर्मित छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर ही निर्माण झाल्याने येथील पाणी ही मोठ्या प्रमाणात रस्तावर येऊन सदाचार हॉल वळणा कडे वाहत होते. खड्गाव वळणावर तर तलावंच निर्माण झाल्याचे दिसून आले.

या त्रासाचा सामना करीत असतानाच सुरक्षा नगर वळण,शुभम मंगल कार्यालय, बस स्टॉप,ते खड्गाव वळण हा रस्तावर खड्डेच खड्डे पडले असून त्यात हे पावसाचे पाणी जमा झाल्याने वाहन चालक, शाळकरी मुले यांना अत्यन्त त्रासाचा सामना करावा लागला.त्रस्त वाहन चालक यांनि ना.नितीन गडकरी च्याच शहरात रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा संतप्त प्रश्नन उपस्थित केला.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष आशीष इखनकर,दत्तवाडी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बिपिन टेम्भुरने ,शिवसेनेचे मधु मानके, कॉम्ग्रेस चे अनिल पाटील,इ नी प्रतिक्रिया दिली की आधीच या निर्माण कार्या मुळे व वाहतूक एकेरी करण्यात आल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. एकेरी वाहतूक,खड्डे युक्त रस्ते, रस्त्या शेजारी पसरलेली गिट्टी या मुळे नागरिक व वाहन चालक अपघाताच्या भीतीने त्रस्त झाले आहे. त्रास व दुर्घटना टाळण्यासाठी नगरपरिषद प्रशासन,उडान पूल कंत्राटदार,वाहतूक व पोलीस विभाग यांनी समनव्य साधून येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी कार्यवाहीची मागणी ही त्यांनी केली आहे.आता हे सर्व विभाग काय दिलासा देतात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.