Published On : Wed, Jun 11th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नौदलाचे निवृत्त लढाऊ जहाज आयएनएस गुलदारला बनवणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटनस्थळ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.

भारतातील हा पहिलाच उपक्रम असून यामुळे सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना मिळणार आहे. केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज आयएनएस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे. याअंतर्गत नौदलातून सेवानिवृत्त झालेले आयएनएस गुलदार हे जहाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ समुद्रात पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे

Gold Rate
11 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,800/-
Gold 22 KT ₹ 1,13,300/-
Silver/Kg ₹ 1,66,700/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement