Advertisement
नागपूर : शहरात सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. स्टॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने ७८ वर्षीय निवृत्त सहायक व्यवस्थापकाची ३६ लाख ७७ हजार ५०० रुपयांनी ऑनलाइन फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, खाजगी कंपनीतून सहायक व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले ७८ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गवसी मानापूर येथे राहतात.
सायबर गुन्हेगाराने त्यांचा विश्वास संपादन करून ट्रेडिंगच्या नावावर जास्त नफा देण्याचे आमिष दाखविले.
आरोपीने आरटीजीएस व ऑनलाइनद्वारे ३६ लाख ७७ हजार ५०० रुपये भरण्यास भाग पाडून त्यांना कोणताही नफा न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.