Published On : Mon, Jun 11th, 2018

बीड विधानपरिषद: मतमोजणीचे हायकोर्टाचे आदेश

Advertisement

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या लातूर-उस्मानाबाद-बीड मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी तात्काळ करून निकाल घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाला दिले आहेत.

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी बीड नगरपालिकेच्या १० सदस्यांना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरवले होते. नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याचा ठपका ठेवत एकतर्फी कारवाईस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यानंतर खंडपीठानं अपात्र ठरविलेल्या नगरसेवकांना निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी दिली होती. त्यांच्या मतांची मोजणी करावी; परंतु त्यांच्या मतांचा परिणाम निवडणुकीवर होत असेल, तर निकाल जाहीर करण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाच्या अंतरिम निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आज निवडणूक मतमोजणी तात्काळ करून निकाल जाहीर करण्याचे आदेश आज सकाळी निवडणूक आयोगाला दिले आहेत. खंडपीठाचे आदेश थोड्याच वेळात जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना मिळतील. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे सुरेश धस आणि अपक्ष अशोक जगदाळे यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीत विजयी होणार असल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केला आहे. आज संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement