Published On : Mon, May 3rd, 2021

कामठी शहरातील बंद पडलेली गॅस कंपनी पूर्ववत सुरू करा – खोब्रागडे

Advertisement

कामठी :-कामठी शहरातील मिनी एमआयडीसी म्हणून ओळख असलेले खूप उद्योगधंदे बंद पडले असून यातील एक गॅस कंपनि सुद्धा बंद पडली आहे.सध्याच्या कोरोना विषाणू च्या महामारीच्या स्थितीत परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी स्थिती असून प्रशासन सुद्धा हतबल झाले आहे वास्तविकता कामठी शहराला लागून असलेली घोरपड मार्गावरील गॅस कंपनी ही 25 वर्षांपूर्वी बंद पडली असून या कंपनीतुन गॅस सिलेंडर भरून तयार करून बाहेरगावी पाठविण्यात येत होते.सद्याची ऑक्सिजन चा तुटवडा लक्षात घेता सर्वसामान्य रुग्णाला मदतशील व्हावी

या उदार विचारसरनेतुन 25 वर्षांपूर्वी बंद पडलेली गॅस कंपनी पूर्ववत रित्या सुरू झाल्यास कामठी शहरातील जनतेचा कायंमच ऑक्सिजन चा प्रश्न सुटेल, नागपूर शहरालाही मदतशील ठरणारे ही गॅस कंपनी राहील आणि काही प्रमाणात का होईना रोजगाराचा ही प्रश्न मार्गी लागेल तेव्हा कामठी शहरातील राजकीय पुढारी, समाजसेवक, धार्मिक सेवक, सामाजिक स घटना, नगरसेवक, आदींच्याया वतीने नवयुवक मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था कामठी चे अध्यक्ष जितेंद्र खोब्रागडे यांनी तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन सादर करीत कामठी घोरपड मार्गावरील 25 वर्षांपासून बंद पडलेली ऑक्सिजन सिलेंडर गॅस कंपनी पूर्ववत सुरू करण्याची मागणो करण्यात आली.