Published On : Mon, May 3rd, 2021

पोलिसांनी दिले 60 गोवंश जनावरांना जीवनदान, आरोपी पसार होण्यास यशस्वी

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव पुलिया जवळून पांढऱ्या रंगाच्या 12 चाकी कंटेनर ट्रक क्र एम पी 07 एच बी 1995 ने अवैधरित्या 60 गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करून कत्तलखान्यात कत्तलीसाठी वाहून नेत असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी यशस्वीरीत्या सापळा रचून सदर घटनास्थळी ट्रक ला थांबविले असता ट्रक चालक व त्याच्यासोबतचे इसम पोलिसांना पाहून अटकेच्या भीतीपोटी अंधुक प्रकाशाचा फायदा घेत ट्रक सोडून पसार होण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनात पिवळया रंगाचे 60 गोवंशोय जनावरे एकावर एक निर्दयतेने दोरीने बांधून कोंबलेले दिसले. दरम्यान हे पूर्ण 60गोवंशोय जनावरे ताब्यात घेऊन त्यांना भांडेवाडी च्या राधेश्याम गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आले तसेच सदर ट्रक पोलीस स्टेशन ला ताब्यात घेत पसार आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाही गतरात्री 12 वाजेदरम्यान केली असून या कारवाहितुन 60 पांढऱ्या पिवळ्या रंगाचे गोवंशीय जनावरे किमती 9लक्ष रुपये व जप्त कंटेनर ट्रक किमती 15 लक्ष रुपये असा एकूण 24 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाहो डीसीपी निलोत्पल, एसीपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ट पोलीस निरीक्षक विजय मालचे,एपीआय सुरेश कननाके,हिट पथकातील वेदप्रकाश यादव, श्रीकांत भिष्णुरकर,मंगेश गिरी, आशिष भुरकुंडे, तसेच बिट मार्शल पप्पू यादव, मंगेश लांजेवार, डी बी पथकातील राजेंद्र टाकळीकर, मंगेश यादव, सुधीर कनोजिया यांनी केली असुन पुढील तपास सुरू आहे.