Published On : Thu, Oct 6th, 2022
By Nagpur Today Nagpur News

महामानवाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करा – फडणवीस

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेसला भेट

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापक ॲड. सुलेखा कुंभारे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य श्रीमती रीनचेन ल्हामो, डॉ. राजेंद्र गवई, सीमा आठवले यावेळी उपस्थित होत्या.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रारंभी तथागत गौतम बुध्दांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन बुध्दवंदना घेतली. तसेच धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त आलेल्या अनुयायांना शुभेच्छा दिल्या. दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसमुळे जागतिक स्तरावर नागपूर ओळखले जाते. ड्रॅगन पॅलेस आणि परिसराच्या विकासामध्ये ॲड. सुलेखा कुंभारे यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement