Published On : Tue, Jun 30th, 2020

शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे प्रश्न प्राधान्याने सोडवा:- प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे

Advertisement

कामठी:- निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा हा आर्थिक संकटात अडकलेला आहे तरीसुद्धा हा शेतकरी राजा नव्या उमेदीने शेतीकामाला लागला असून या खरीप हँगामातच बोगस बियाण्यांचा फटका शेतकऱ्यांच्या माथ्यावर पडला आहे परिणामी त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या हितार्थ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे प्रश्न प्राधान्याने सोडवा असे आव्हान जिल्हा परिषद चे स्थायी समिती सदस्य प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे यांनी आज कामठी पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत केले.

जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य प्रा. अवंतिकाताई लेकुरवाळे* यांच्या विशेष पुढाकाराने शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचे प्रश्न सोडविण्यासाठी कामठीचे खंड विकास अधिकारी *सचिन सूर्यवंशी* यांचे मार्फत पंचायत समिती कामठी येथे बँक प्रतिनिधींची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत लिड बँकेचे व्यवस्थापक यांचे अध्यक्षतेमध्ये शेतकऱ्यांच्या पिक कर्जाविषयी समस्यांवर चर्चा करण्यात आली. व त्वरित सर्व बँकांना त्यांच्या पिक कर्जाचे टार्गेट पूर्ण करण्याविषयीची सूचना देण्यात आली. आणि ज्या बँकांमध्ये कृषी अधिकारी नाहीत त्या बँकांमध्ये त्वरित कृषी अधिकारी नियुक्त करण्याविषयीचे निर्देश संबंधित बँकांना देण्यात आले.

याप्रसंगी बैठकीत सभेमध्ये तहसिलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, दुय्यम निबंधक पंकज वानखेडे,पंचायत समिती सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मल्लेवार, सदस्य दिशा चनकापुरे* व *सुमेध रंगारी*, व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी