नागपूर : राज्यात महायुतीचे सरकार स्थापित होणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर अली आहे. मी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे अशी विनंती केली. सर्व आमदारांची अशी इच्छा आहे.
मला विश्वास आहे की त्यांच्याकडून सकारात्मक विचार होईल. आम्ही तिन्ही मिळून आणि इतर पक्षांना सोबत घेऊन निर्णय घेऊ आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे.
महाराष्ट्राला दिलेले वचन आम्ही पूर्ण करु. मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. की त्यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला नेतृत्व करण्याची संधी दिली. मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, रामदास आठवले यांचे आभार व्यक्त करतो. मी महाराष्ट्रात एक चांगले सरकार देईल, असा दावा फडणवीस यांनी केला.