Published On : Tue, Jan 18th, 2022

नाना पटोलेंविरोधात गुन्हा नोंदवा

Advertisement

माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात बजाज नगर पोलिस स्टेशनमध्ये निवेदन

नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात गुन्हा नोंदविण्यात यावा, या मागणीचे निवेदन माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी प्रभाग १६च्या वतीने बजाज नगर पोलिस स्टेशनमध्ये मंगळवारी (ता.१८) देण्यात आले.

Advertisement
Advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रभाग १६ मधील रहिवासी आहेत. त्यांनी देशाच्या पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह विधान करणे ही बाब अत्यंत चुकीची असून हे कृत्य असंविधानिक आहे. नाना पटोलेंच्या या कृत्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली.

याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका लक्ष्मीताई यादव, वनिताताई दांडेकर, नगरसेवक लखन येरवार, अध्यक्ष राजेंद्र मुंडले, गजानन निशीतकर, चरणदास वानखेडे, सारंग देव, हृषीकेश चक्रदेव, जयंत आदमने, मनोज देशपांडे, पराग जोशी, दिलीप बुक्कावार, आनंद टोळ, नीरज दोंतुलवार, अमोल वटक, राजू धाबे, राजू रोडी, मनोज फणसे, शशांक चोबे, आनंद माथनकर, कल्पना घाटोळ, हेमा आदमाने, अर्चना शृंगारपूरे, योगिता धार्मिक, कीर्ती पुराणिक, साकेत वनकर, अनुराग नेवारे, सुनील दांडेकर, मिलिंद कोल्हटकर, राजेश गायधने, नागेश साठवणे, अश्विनी सावदेकर, रेणुका गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement