Published On : Sat, Aug 29th, 2020

महाराष्ट्राचे प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ. आशिष देशमुख “एमएस सिग्नेचर” पुरस्काराने सन्मानित

कित्येक दशकांपासून व्यापक दृष्टी असलेल्या डॉ. आशिष देशमुख यांना वैद्यकीय विज्ञान, शैक्षणिक सुधारणा आणि नवकल्पना, आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी, कृषी आणि शेती, भाषा आणि कला, साहित्यामध्ये विशेषतः हिंदी साहित्य / मराठी / इतर प्रादेशिक भाषा, संगीत, नृत्य आणि मनोरंजन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजातील सर्व कानाकोपऱ्यांचे सामाजिक उत्थान या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि सेवांच्या क्षेत्रात “सनसनाटी नेतृत्व” आणि “अतुलनीय योगदानाबद्दल” २०२०चा सर्वात प्रतिष्ठित एमएस सिग्नेचर पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

शांतता, समर्पण आणि सर्वांसाठी चांगल्या जीवनशैलीबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक करून जागतिक पुरस्कार समितीने त्यांचे अमुल्य योगदान जागतिक स्तरावर विचारात घेतले. मौनधारण करून शांततेने काम करणे हे गाजावाजा करण्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे, हे डॉ. आशिष देशमुख यांच्या कार्याने सिद्ध केले आहे.

एमएस सिग्नेचर पुरस्कार हा पूर्णपणे ऐच्छिक पुरस्कार असून “ध्येयवादी नायक, त्यांचे सुप्त कलागुण आणि त्यांचे अतुलनीय कार्य” जागतिक व्यासपीठावर आणणे हे पुरस्कारामागील उद्दीष्ट आहे, जेणेकरून वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांद्वारे जगात सर्वत्र मानवजातीचा फायदा होईल. समाजासाठी आणि वंचितांसाठी उत्कृष्ट काम करणार्‍या लोकांना एमएस सिग्नेचर पुरस्कार देण्यात येतो. आस्क अँड गेट सोल्यूशन्स गेल्या ३ वर्षांपासून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करीत आहे. गेल्या वर्षी भारत आणि परदेशातील अनेक दिग्गजांना लॉर्ड्स ऑफ प्लॅनेट पुरस्कार मिळाला आहे.

यावर्षीचे पुरस्कार प्राप्त मान्यवर आहेत-
डॉ. सीमा कपूर, श्री. प्रकाश खारवडकर कानपूर, डॉ. अबोली गोरे पाटणा, डॉ. आशिष देशमुख नागपूर, डॉ. वैदेही मराठे, डॉ. राकेश मिश्रा, डॉ. शोभा, श्री. विनय देशमुख, डॉ. सलीमा भाटीया, श्री. गिरीश भवरे, डॉ. रितू अग्रवाल, डॉ. तरुणसिंग सोढा, डॉ. नरेंदर गोस्वामी, डॉ. तृप्ती नगारीया, डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. रोहिदास चव्हाण, डॉ. शबाना, डॉ. मीना हिवलेकर, डॉ. कालिदास परशुरामकरण, डॉ. सोनू लोहिया.
विशेष म्हणजे यात विदर्भाचे ७ पुरस्कारप्राप्त मान्यवर आहेत, ज्यांचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे.