नागपूर : प्रख्यात अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी आज शहरातील गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरला सदिच्छा भेट देत सामाजिक उपक्रमांप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली.
श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने त्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष व आमदार संदीप जोशी यांनी सई ताम्हणकर यांना डायग्नोस्टिक सेंटरमधील अत्याधुनिक यंत्रणा, उपलब्ध वैद्यकीय सुविधा आणि रुग्णसेवेच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
सदर भेटीदरम्यान सई ताम्हणकर यांनी सेंटरच्या कामकाजाची पाहणी करून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्यसेवेचे कौतुक केले. सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
यावेळी आमदार संदीप जोशी यांच्या हस्ते सई ताम्हणकर यांना श्री सिद्धिविनायकाची प्रतिमा सस्नेह भेट देण्यात आली. त्यांनीही संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा देत अशा सेवाभावी कार्याला समाजाचा अधिकाधिक पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी, वैद्यकीय कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





