Published On : Fri, Mar 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरकडे देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; मामा-भाचा ठार, दोघे गंभीर

Advertisement

नागपूर : उज्जैन येथे देवदर्शन करून नागपूरकडे परतत असलेल्या भाविकांच्या कारचा मध्य प्रदेशात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बैतूल-हरदा सीमेवरील ढाकना गावाजवळ ही घटना घडली. या अपघातानंतर नागपूर आणि कामठी परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनजवळील नलखेड़ा येथील बगलामुखी मंदिरात दर्शन आटोपून चार जण नागपूरकडे परतत होते. त्यावेळी अचानक कारवरील ताबा सुटल्याने वाहन उलटले. अपघात इतका भीषण होता की कामठी येथील शुभम उर्फ विजय जायसवाल (२८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे मामा पारस कनोजिया (३५, रा. मानकापूर, नागपूर) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या दुर्घटनेत अमन जायसवाल (२६) आणि जतिन कनोजिया (३४) गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांना पुढील उपचारासाठी भोपाळ येथे हलविण्यात आले आहे. प्राथमिक तपासात चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपघातानंतर मागून येणाऱ्या टवेरा वाहनचालक अंकित तिवारी यांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. जखमींच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी काही प्रवासी झोपेत होते, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली.

Advertisement

या हृदयद्रावक घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून नागपूर आणि कामठी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges