Published On : Mon, Aug 21st, 2017

मिरा-भाईंदरमध्ये भाजपची जोरदार घोडदौड

Advertisement


मिरा- भाईंदर महानगरपालिकेच्या ९४ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होईल. भाजपचे ‘शत प्रतिशत धोरण’, त्या दृष्टीने राबवण्यात आलेली आक्रमक रणनीती, भाजपशी सतत दोन हात करण्याच्या तयारीत असलेली शिवसेना आणि अमराठी उमेदवारांना उभे करण्याची काँग्रेसची खेळी या घटकांमुळे यंदाची निवडणूक कधी नव्हे इतकी रंगतदार बनली आहे.

संसद ते पंचायत तक’ एकहाती सत्ता मिळवण्याच्या धोरणानुसार भाजपने या निवडणुकीतही स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले होते. तर आपले प्रादेशिक वर्चस्व कायम राखण्यासाठी शिवसेनेनेही या निवडणुकीत पूर्ण जोर लावला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी जाहीर सभा घेऊन केलेला प्रचार पाहता मिरा-भाईंदर महानगरपालिका दोन्ही पक्षांसाठी प्रतिकात्मकदृष्ट्या किती महत्त्वाची आहे, याची कल्पना येऊ शकते. राज्याच्या राजकारणात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीला तितकेसे महत्त्व नसले तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातील वर्चस्ववादाच्या लढाईत मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा निकाल निर्णायक ठरू शकतो.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मिरा-भाईंदर महापालिका : आतापर्यंतचे निकाल (13:45)

भाजप- 47
शिवसेना – 09
काँग्रेस- 06
राष्ट्रवादी – 00
अपक्ष/इतर- 00
एकूण- 64/95

आतापर्यंतचे निकाल: प्रभाग क्रमांक १ – अबकड – भाजपा, प्रभाग क्रमांक २ – अबकड – भाजपा, प्रभाग क्रमांक ३ – अबकड – भाजपा, प्रभाग क्रमांक ६ – अबकड – भाजपा, प्रभाग क्रमांक ८ अ – कथलीन परेरा शिवसेना, ब क ड – भाजपा (तीन जागा), प्रभाग क्रमांक ९ – अबकड – काँग्रेस, प्रभाग क्रमांक १० – अबकड – शिवसेना, प्रभाग क्रमांक १२ – अबकड – भाजपा, प्रभाग क्रमांक १३ – अबकड – भाजपा, प्रभाग क्रमांक १४ – अबकड – भाजपा, प्रभाग क्रमांक १७ – अबकड – भाजपा, प्रभाग क्रमांक १९ – अबकड – शिवसेना, प्रभाग क्रमांक २२ – अबकड – भाजपा, प्रभाग क्रमांक २३ – अबकड – भाजपा

 

Advertisement
Advertisement