Published On : Sat, Dec 30th, 2017

वाडीत बँके समोरील पार्किंग मधील दुचाकी च्या डिक्कीतीतून 60 हजार रु लंपास

Advertisement

वाडी(अंबाझरी): वाडी मधील अमरावती महामार्ग दाभा वळणासमोर असलेल्या युनियन बँके समोरील वाहन पार्किंग मधून एका ग्राहकाच्या दुचाकी वाहनाच्या डीक्कीतून अज्ञात चोरट्याने 60 हजार रु असलेली पिशवी उडविल्याची घटना शनिवार दि,30 ला घडली,यामुळे परिसरातील ग्राहकात खळबळ उडाली.साठ हजार रु चा फटका बसणाऱ्या या ग्राहकाचे नाव भुनेश्वर देवनलाल पटले वय 37 असून ते हरिओम सोसायटी दत्तवाडी येथील निवासी असून ते आदित्य अनधा या बँकेत पिग्मी एजंट आहेत.

त्यानी दिलेल्या माहिती नुसार ते शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास आपले दुचाकी वाहन क्र. MH- 40/ M/ 4005 घेऊन युनियन बँकेत गेले,बँकेतुन व्यवहार संपवुन जेंव्हा ते परत बँके समोरील पार्किंग मधील आपल्या दुचाकी जवळ आले तेव्हा त्यांना दुचाकी पंचर असल्याचे आढळले म्हणुन जवळच्या दुकानात प॔चर बनविण्यासाठी वाहन देवुन ते पायी पायी काटोल वळनावरील आदित्य अनघा या बँकेत पुढील व्यवहार करण्यासाठी गेले तोपर्यंत पैशाची पिशवी त्यांच्या जवळ होती.तिकडून जेव्हा ते परत आपल्या वाहनाजवळ आले तेव्हा त्यांनी पैशाची पिशवी दुचाकी च्या डिक्कीत ठेवली व त्यांनी पंचर दुरूस्ती करणाऱ्याला पैसे देऊन झाल्यावर ते पुढील व्यवहारासाठी दुचाकी ने निर्मल अर्बन बँकेत गेले,तेथे त्यानी डिक्की उघडून पाहिली असता त्यांची रु 60 हजार असलेली पैशाची बॅग आढळून आली नाही.ते घाबरून गेले, त्यानी चिंताग्रस्त होऊन आजू बाजूला विचारणा केली, माहिती घेतली परंतु कुणीही दाद वा माहिती दिली नाही.

याच युनियन बँकेच्या खाली त्यांचे ATM केंद्र असून हा परिसर अत्यन्त वर्दळीचा आहे हे विशेष. त्यांनी अखेर परिचय असलेल्या वाडी नगर परिषद पत्रकार संघाच्या सदस्यांशी सम्पर्क साधून या घटनेची माहिती देऊन सहकार्याची विनंती केली.परिस्थतीचे गांभीर्य ओळखून संघाच्या सदस्यांनी त्यांना घेऊन वाडी पोलीस स्टेशन गाठले,घटना समजून सांगून,तक्रार नोंदविली.तक्रार प्राप्त होताच दुय्यम पोलीस निरिक्षक जाधव यांनी घटना स्थल गाठून तपास सुरू केला.आजू,बाजूला व ते जिथे जिथे गेले होते त्या ठिकाणी तसेच पंक्चर दुरुस्त करणाऱ्या कडे चौकशी केली,मात्र काही यश आले नाही.शेवटी अन्यायग्रस्त व पत्रकारांनी त्यांना बँके समोर,ATM समोर जे नियम व सुरक्षेसाठी CCTV केमेरे लावलेले असतात त्याची पाहण्याची विनंती केली,परंतु नंतर असे निदर्शनास आले की या दोन्ही ठिकाणी CCTV लागलेले नाहीत.त्या मुळे हा एक महत्वाचा तपास व मदतीचा दुवा फेल ठरला.

या मुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिशा निर्देशा प्रमाणे बॅकेत,पार्कींग स्थल,ATM केंद्रात व बाहेर ही सोय,व शिपाई नियुक्ती आवश्यक असताना या ठिकाणी या सोई बँकेने ग्राहक सुरक्षेच्या दृष्टीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, या संदर्भात पत्रकारांनी युनियन बँकेचे शाखा प्रबंधक नरेंद्र बोरीकर यांची भेट घेतली असता बँक व ATM च्या आतील भागात cctv कॅमेरे उपलब्ध आहेत, बँकेच्या समोरील पार्कींग भागात cctv व सुरक्षा रक्षकाची मागणी करील अशी प्रतिक्रिया दिली.त्यामुळे आता वाडी परिसरातील सर्व बॅक,वित्तीय संस्था यानी केलेल्या सुरक्षेचा आढावा घ्यावा अशी प्रतिक्रिया अन्याग्रस्त भुनेश्वर पटले यांचे सह घटना स्थळी जमलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.सदर रकमेची चोरी रेकी करून केल्याची स्थिती दिसत असल्याने व असे प्रकार या पूर्वी घडले असल्याने ग्राहकांनी जागरूक राहण्याचे आवाहन वाडी नगर परिषद पत्रकार संघाने केले असून वाडी पोलीसा समोर या चोरट्याला जेरबंद करण्याचे आव्हान ठरले आहे,पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.