
Display models of Dassault Aviation SA aircraft, including Falcon firefighter, left, and executive jets at the Paris Air Show in Paris, France, on Monday, June 16, 2025. The 55th Paris Air Show runs 16-20 June at Le Bourget airport. Photographer: Nathan Laine/Bloomberg
नागपूर : भारतात व्यावसायिक विमाननिर्मितीच्या क्षेत्रात एक मोठी घडामोड समोर आली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या सहाय्यक कंपनीने फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनसोबत भागीदारी केली असून, नागपूरमध्ये ‘फाल्कन 2000’ व्यावसायिक जेटचं उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. ही माहिती दोन्ही कंपन्यांनी बुधवारी संयुक्त निवेदनात दिली.
या कराराअंतर्गत महाराष्ट्रातील नागपूर येथे ‘फाल्कन 2000’ जेटसाठी अंतिम असेंब्ली लाइन (Final Assembly Line) उभारली जाणार आहे. ही पहिलीच वेळ आहे की डसॉल्ट एव्हिएशन आपल्या या प्रकारातील जेटचे उत्पादन फ्रान्सच्या बाहेर करत आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली आहे.
डसॉल्ट एव्हिएशन २०२८ पर्यंत भारतात बनवलेले पहिले ‘फाल्कन 2000’ जेट कॉर्पोरेट आणि लष्करी वापरासाठी वितरित करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घोषणेनंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये दुपारनंतरच्या व्यवहारात ५ टक्क्यांची उडी पाहायला मिळाली.
ही भागीदारी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला चालना देणारी असून नागपूरसारख्या शहरात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच, भारताच्या संरक्षण आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील स्थान अधिक बळकट होणार आहे.