Published On : Thu, Dec 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कार

Advertisement

2 लाखांचे प्रथम पारितोषिक जाहिर

नागपूर : राज्य सरकारच्या आरोग्य विभागामापर्फत देण्यात येणा-या कायाकल्प पुरस्कार योजनेत नागपुर महानगरपालिके अंतर्गत इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास 2021-22 वर्षाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रथम पारितोषिक स्वरफपात या केंद्राला 2 लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे.

Gold Rate
26 May 2025
Gold 24 KT 95,800/-
Gold 22 KT 89,100/-
Silver/Kg 98,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, फुटाळा उपविजेता पहिले व शेंडे नगर उपविजेता दुसरे ठरले असून, या केंद्रास क्रमशः 1.50 व 1.00 लाखांचे बक्षीस मिळेल. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जयताळा, तेलंनखेडी, सुदाम नगरी, मेहंदीबाग, बाबुलखेडा, नंदनवन, झिांगाबाई टाकळी, भालदारपुरा, के टी नगर, जागनाथ बुधवारी, बिडीपेठ, पाचपावली, कपिलनगर, पारडी, मोमीनपुरा, हजारीपहाड, हुडकेश्वर, नरसाळा, डिप्टी सिग्नल या 18 आरोग्य संस्थाना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाले आहेत.

कायाकल्प योजने अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हयातील तसेच महानगरपालिकेतील सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सहभाग असतो. महानगरपालिका स्तरावरील आरोग्य विभागाचे एक पथक अंतिम परीक्षण करते. त्यात आरोग्य केंद्रातील स्वच्छता, बाहयरुग्ण विभाग, रुग्णांना बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संस्थेचे देखभाल, जैविक कचरा व्यवस्थापन, जंतू संसर्ग व्यवस्थापन इत्यादी बाबींवर मुल्यांकन करुन गुणांकन करण्यात आले.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा 95.00 टक्के गुण प्राप्त करुन नागपुर महानगरपालिकेमधून प्रथम विजेते ठरले आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र फुटाळा व शेंडे नगर क्रमशा: 94 व 85 टक्के गुण घेवून मनपा क्षेत्रामध्ये प्रथम व द्वितीय उपविजेते ठरले आहेत.

प्राप्त पुरस्कारासाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्ण बी. व अति. आयुक्त श्री राम जोशी यांनी सर्व संस्थांना शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थाना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेन्द्र बहिरवार, अति वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी व माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड यांचे मार्गदर्शन मिळाले. शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, शहर लेखा व्यवस्थापक श्री निलेश बाभरे व शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश गं. बुरे यांनी सर्व बाबींबाबत योग्य ते समन्वय व मार्गदर्शन संस्थांना दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement