Published On : Mon, Aug 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मोबाईल क्रमांक व ई- मेल नोंदवा, वीजबिल तत्काळ मिळवा

Advertisement

नागपूर,:- मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना महावितरणतर्फे दरमहा वीजबिल तयार होताच ऑनलाईन पाठविण्यात येते. नागपूर परिमंडलात सर्व वर्गवारीतील 19 लाख 75 हजार 739 पैकी 18 लाख 40 हजार 26 अर्थात 93.13 टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे.

महावितरणने काही वर्षांपूर्वी केंद्रीकृत बिलिंग प्रक्रिया सुरू न केली आहे. त्यासाठी मोबाईल अॅपद्वारे प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेतले जाते. त्यानंतर केवळ चार ते पाच दिवसांत वीजबिल तयार करून ते मोबाईलवर एसएमएस किंवा ई-मेलद्वारे ग्राहकाला पाठविले जाते. त्यासाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची महावितरणकडे नोंदणी गरजेची आहे. विशेष म्हणजे अशा ग्राहकाला मोबाईल क्रमांक व ई-मेल या दोन्हीवर दरमहा वीजबिल मिळविता येईल. नागपूर ग्रमिण मंडलातील 5 लाख 20 हजार 58 वीज ग्राहकांपैकी 4 लाख 75 हजार 978 ग्राहकांनी अर्थात 91.52 टक्के ग्राहकांनी, नागपूर शहर मंडलातील 10 लाख 19 हजार 728 वीज ग्राहकांपैकी 9 लाख 55 हजार 138 ग्राहकांनी अर्थात 93.07 टक्के ग्राहकांनी तर वर्धा मंडलातील 4 लाख 35 हजार 953 वीज ग्राहकांपैकी 4 लाख 8 हजार 910 ग्राहकांनी अर्थात 93.8 टक्के ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी महावितरणकडे केली आहे

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तर करा मोबाईल नंबर अपडेट

काही ग्राहकांचे चुकीचे क्रमांक नोंदवलेले असू शकतात, अशा ग्राहकांनी आपला अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा. तसेच ज्या ग्राहकांना आधी नोंदवलेला मोबाईल क्रमांक बदलायचा असेल त्यांनीही नवीन क्रमांक नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी करा ई-मेल किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी
महावितरणच्या संकेतस्थळावरून किंवा महावितरण अॅपद्वारे मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून टफ्एॠ (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाइप करून 9930399303 या क्रमांकावर एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते

प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काऊंट साठी सोईचे
वीजबिलांच्या तारखेपासून 7 दिवसात भरणा केल्यास एक टक्का प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट मिळते. त्याची तारीख वीजबिलात नमूद असते. एसएमएस किंवा ई-मेलवर वीजबिल घेतल्यास ही सूट मिळविणे अधिक सोयीचे आहे. मोबाईल क्रमांक नोंदणी केल्यास पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्ती, खंडित वीजपुरवठ्याची माहिती, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व युनिटची संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस याची माहिती मोबाईलवर येते. त्यामुळे सर्व ग्राहक तसेच जे वीजवापरकर्ते हे भाडेकरू म्हणून राहत आहेत त्यांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement