Published On : Fri, Jul 23rd, 2021

क्षेत्रीय लोक संपर्क ब्‍यूरो नागपूरच्‍या वतीने टोक्यो ओलंपिक स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन

नागपूर : टोक्‍यो ओलंपिक स्पर्धांचा शुभारंभ झाला असून यात सहभाग घेणा-या भारतीय खेळाडूंनचे मनोबल वाढविण्‍या\साठी आणि शुभेच्‍छा देण्‍यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीन असणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो नागपूरच्‍या वतीने आणि नेहरू युवा केन्‍द्र आणि जेडी स्‍पोर्टस् युथ फाउंडेशनच्‍या सहकार्याने सायकल रैलीचे आयोजन क्रीडा चौक, ईश्‍वर देशमुख कॉलेज येथून करण्‍यात आले होते , ही रॅली अजनी पोलीस स्‍टेशन पासून परत क्रीडा चौक येथे संपन्न आली.

सायकल रैलीतील सर्व युवकांनी भारतीय संघातील खेळाडूंनचे चिअर फॉर इंडीया मोहीमे अन्‍तर्गत सेल्‍फी स्टैंड सोबत सेल्‍फी घेउन भारतीय खेळाडूंनचे मनोबल वाढविले. सायकल रैलीचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय नागपूर विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांच्‍या हस्‍ते हिरवी झंडी दाखवून शुभारंभ करण्‍यात आला .

याप्रसंगी, अर्जुन अवार्ड विजेते तसेच द्रोणाचार्य अवार्ड विजेते विजय मुनिश्‍वर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवक विकास अधिकारी उदय धिर , ईश्‍वर देशमुख कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती शारदा नायडू, ईश्‍वर देशमुख शा. शि.महाविद्यालयाचे प्रा. संभाजी भोसले, मोहता सायन्‍स कॉलेज, सचिव, जिल्हा जलतरण संघटना,डॉ.जय प्रकाश दुबळे, माजी सहसंचालक क्रीडा युवा सेवा, पूणे, डॉ. केशव भगत, माजी प्राचार्य, ईश्‍वर देशमुख शा. शि.महाविद्यालय, तसेच क्षेत्रीय लोक संपर्क ब्‍यूरो नागपूरचे कार्यालय प्रमुख संजय तिवारी, नरेश गच्‍छकायला मान्‍यवर उपस्थित होते. या सायकल रैलीचे संचालन जेडी स्‍पोर्टस युथ फाउंडेशन, नागपूरचे जयंत दुबळे यांनी केले.

टोक्‍यो ओलंपिक मध्‍ये खेळाडूंना प्रोत्‍साहित करण्‍या साठी आणि शुभेच्‍छा देण्‍यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या , क्षेत्रीय लोक संपर्क ब्‍यूरो नागपूरच्‍या वतीने विभागीय क्रिडा संकुल परिसर, मानकापूर, येथे ‘चिअर फॉर इंडीया’ सेल्‍फी स्‍टेंड स्‍थापित करण्‍यात आले आहे. सध्‍या सेल्‍फी स्‍टैंड नवीन सचिवालय भवन, सिवील लाइन्‍स, नागपूर येथे ठेवण्‍यात आलेला आहे. या सेल्‍फी स्‍टैंड सह आपल्‍या परिवारा सोबत, मित्रांसोबत फोटो काढून सोशल माध्‍यम वर टैग करून चिअर फॉर इन्‍डीया ला जन आन्‍दोलन बनवावे , असे आवाहन क्षेत्रीय लोक संपर्क ब्‍यूरो नागपूरचे तांत्रिक सहायक संजय तिवारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.