Published On : Fri, Oct 2nd, 2020

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात दोनशे पदांसाठी भरती सुरु

Advertisement

– महास्वयंम संकेतस्थळावरुन सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर : नागपूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑनलाईन पध्दतीने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ रोजगार मेळावा घेण्यात येत असून या मेळाव्यात दोनशे विविध पदांसाठी संधी उपलब्ध झाली आहे.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी व लॉगइन करुन पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबमध्ये जाऊन नागपूर जिल्हा सिलेक्ट करावे. नंतर पुढे एम्प्लॉयर सिलेक्ट करावा व इच्छुक रिक्त पदाकरिता अप्लाय करावे. एम्प्लॉयरकडून उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. गं. हरडे यांनी केले आहे.

आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत असल्याने रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात गवंडी, सुतारकाम, फिटर, बार बेडिंग व फिक्सींग करणारे, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, सीएनसी ऑपरेटर, मशिनिस्ट आणि अकुशल कामगार (श्रमिक) इत्यादी पदे उपलब्ध आहेत.

नोंदणी करण्यासाठी काही अडचण येत असल्यास 0712-2531213 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.गं. हरडे यांनी केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement