Published On : Tue, Jun 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

एसटीचा तोटा भरून काढा, अन्यथा नोकरी धोक्यात; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना ३० दिवसांचा इशारा

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक भूमिका घेतली आहे. महसूल वाढवण्यात अपयशी ठरणाऱ्या आणि कामकाजात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी थेट ३० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

मंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पुढील एका महिन्यात एसटीच्या उत्पन्नात समाधानकारक वाढ दिसून आली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. केवळ बदलीच नव्हे, तर पदावनती किंवा थेट निलंबनाचाही सामना करावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक घडी विस्कटत असताना महसूल वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात अनेक अधिकारी अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निष्क्रिय आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण स्वीकारण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील ३१ विभागांपैकी तब्बल २१ एसटी विभाग तोट्यात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या विभागांची कार्यक्षमता वाढवणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि प्रवासी उत्पन्न वाढवणे यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस कृती आराखडा राबवावा, अन्यथा कठोर प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.