Published On : Thu, Mar 15th, 2018

शहरातील पोलिस निवासस्थाने व रस्त्यांसाठी 12 कोटींवर निधीस मान्यता

Advertisement

Nagpur-Police-1
नागपूर: शहरातील पोलिसांची निवासस्थाने व पोलिस वसाहतींमधील रस्त्यांसाठी 12 कोटी 21 लाख 27 हजार रूपयांच्या खर्चांनाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हा निधी गृह विभागासाठी मिळणार आहे. नागपूर शहर पोलिस आयुक्तांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात पोलिसांची निवासस्थाने व पोलिस वसाहतींमधील रस्त्यांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता.

हुडको इमारत व लाल इमारत पोलिस लाईन टाकळी येथे सीलिंग प्लास्टर, टाईल्स बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी 3 कोटी 24 लाख 49 हजार रूपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. पोलिस लाईन टाकळी येथे 450 पोलिस कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम, इमारत दुरूस्ती आदी कामांसाठी 2 कोटी 17 लाख 80 हजार रूपये खर्चाला मान्यता मिळाली आहे.

पोलिसांसाठी डी,ई, व एफ बराकींचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामासाठी 3 कोटी 64 लाख रूपयांना मान्यता मिळाली आहे. पोलिस मुख्यालय व पोलिसांच्या वस्तीतील अंतर्गत रस्ते दुरूस्ती करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत. गेल्या तीन वर्षाच्या काळात शहर पोलिस विभागाला इमारती व निवासस्थाने बांधकामासाठी 15 वर्षात मिळाला नाही, त्यापेक्षा जास्त निधी विद्यमान शासनाने दिला असल्याचे येथे उल्लेखनीय आहे.

याशिवाय पोलिस विभागाला जिल्ह्यातील कामासाठी 1 कोटी 62 लक्ष रूपये याआधी देण्यात आला आहे. हा निधी वितरितही करण्यात आला.रामटेक पोलिस चौकीसाठी 12 लक्ष, अमली पदार्थ गोदाम 15 लक्ष, काटोल कॅन्टीन 10 लक्ष, नंदनवन पोलिस स्टेशन इमारत 32 लक्ष, कान्होलीबारा पोलिस चौकी 25 लक्ष, खापा महिला बरॅक 16 लक्ष, सावरगाव पोलिस चौकी 9 लक्ष, केळव 4 महिला गृह 14 लक्ष, कुही महिला गृह 15 लक्ष, रामटेक महिला गृह 15 लक्ष रूपयांची कामे करण्यात येत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.