| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jul 10th, 2017

  विभागीय लोकशाही दिनात 6 तक्रारी प्राप्त

  Lokshahi
  नागपूर: अपर आयुक्त आर. एस. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात नागरिकांकडून 6 तक्रारी स्वीकारण्यात आल्यात. प्राप्त झालेल्या तक्रारी महानगरपालिका, नागपूर-1, उपायुक्त (विकास) नागपूर-1, जिल्हाधिकारी, नागपूर-1, जिल्हाधिकारी, भंडारा-1, नागपूर सुधार प्रन्यास-1, नगरपालिका प्रशासन, नागपूर-1 अशा एकूण 6 तक्रारींचा विभागीय लोकशाही दिनात समावेश होता. तसेच जुन्या 8 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.

  या लोकशाही दिनाला विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र, नागपूर, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर, पोलीस अधीक्षक ग्रामीण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145