| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jul 10th, 2017

  उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या कार्यालयांना पुरस्कार


  नागपूर: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या कार्यालयांना प्रादेशिक संचालकांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.

  नागपूर प्रादेशिक कार्यालयात विदर्भातील सर्व अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक काटोल रॊड कार्यालयात प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आली होती. या वेळी नागपूर शहर मंडळ, काँग्रेस नगर विभाग, आलापल्ली विभाग तसेच अकोला शहर विभाग यांना चांगली कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अधीक्षक अभियंता मनीष वाढ, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, अमित परांजपे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

  ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी, लघुदाब ग्राहकांना अचूक आणि वेळेत वीज देयक अदा करणे, ५ टक्के वीज देयकाची तपासणी करणे, लघुदाब ग्राहकांची वीज विक्रीत वाढ करणे या निकषांचा समावेश होता. यासाठी विदर्भातील ५५ परिमंडळ, मंडळ आणि विभागीय कार्यालयातुन यांची निवड करण्यात आली . अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रोत्सहीत करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात केली आहे, असे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी यावेळी स्पष्ट केले .

  बैठीकीस गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी, अकोला परिमंडळाचे अरविंद भादीकर, अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल , नागपूर परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता उमेश शहारे उपस्थित होते. .

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145