Published On : Mon, Aug 26th, 2019

एक्वा लाईनवर मेट्रो धावायाला सज्ज

Advertisement

नागपूर : हिंगणा मार्गावरील (रिच-३) येथे लवकरच मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस असून नुकतेच १५ ऑगस्ट रोजी हिंगणा मार्गावर मेट्रोचे ट्रायल रन झाल्यानंतर आता लवकरच एक्वा लाइन सुरु करण्यासाठी महा मेट्रोचे अधिकारी/कर्मचारी दिवस रात्र कार्यरत आहे. सीआरसीसीच्या डालियन प्लांट येथून ५ मेट्रो ट्रेन भारतात पोहोचल्या त्यापैकी दिनांक २५ ऑगस्टच्या मध्यरात्री ३ मेट्रो ट्रेन नागपूरला पोहोचले. त्यामधील २ मेट्रो कोचेस हे हिंगणा डेपो आणि १ मिहान डेपो येथे ठेवण्यात आली आहे. सध्या इंटरचेंज स्टेशन’ वरून खापरी पर्यंत मेट्रोची सेवा सुरु आहे. तर याच मेट्रो स्टेशन वरून लोकमान्य नगर पर्यंत एक्वा लाइन सुरु करण्यात येणार आहे.

हिंगणा आणि मिहान डिपो येथे या कोचेस्ची असेम्बलिंग पूर्ण करण्यात आली असून ते धावण्यासाठी सज्ज करण्यात येत आहे. सदर कोचेस हे चीनमधील दालीयान येथून समुद्री मार्गाने भारतात चेन्नैच्या बंदरावर आणण्यात आले. दालीयान येथून ते ४ जुलै येथून निघाले व १२ ऑगस्ट २०१९ रोजी चेन्नई येथे पोहोचले. कोचेसला चेन्नई येथून ट्रांस्पोर्टच्या माध्यमाने १७ ऑगस्टच्या रात्री नागपूर करता रवाना करण्यात आले. व हे ट्रेलर २५ ऑगस्ट २०१९ च्या मध्यरात्री नागपूर येथे पोहचले.

याशिवाय सुरक्षा, डिझाईन, मेट्रोच्या आतील फिचर हे अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त असून आता लवकरच शहरामध्ये मेट्रो धावण्यास सज्ज झाले आहे. या कोचेसमध्ये लहान मुलांसह महिला आणि वृद्धांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा आहे.