Published On : Wed, Apr 15th, 2020

रेशनकार्ड नसलेल्या परिवारांचे पुन्हा सर्वेक्षण करावे

खनिज निधीतून सर्वाना जीवनावश्यक वस्तूचे कीट मिळावे

बावनकुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले

नागपूर: कोरोना लॉक डाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची कीट मिळाली नाही अशा व रेशनकार्ड नसल्याची यादी तयार करताना अनेक परिवार जीवनावश्यक किटपासून वंचित राहिले आहेत. अशा परिवाराचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, या मागणीसाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना आज भेटले.

या शिष्टमंडळात आ. अनिल सोले, आ. गिरिश व्यास, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आ. नागो गाणार सहभागी झाले होते. शहर व जिल्ह्यातील ज्या परिवारांकडे रेशनकार्ड आहे, पण रेशन मिळाले नाही, अशा कार्ड धारकांना जीवनावश्यक व आरोग्यविषयक वस्तूच्या कीट देणे आवश्यक आहे. तसेच शहर व जिल्ह्यातील रेशनकार्ड धारक व रेशनकार्ड नसलेल्या परिवारांना दोन्ही कीट देणे आवश्यक आहे अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे.